आजची वात्रटिका
---------------------
चर्चांची चर्चा
उघड चर्चा वेगळ्या असतात,
बंद दाराआडच्या वेगळ्या असतात.
चर्चा चर्चा असल्या तरी,
सर्व अर्थाने चर्चा आगळ्या असतात.
दाखवायच्या चर्चा वेगळ्या असतात,
करायच्या चर्चा वेगळ्या असतात.
सत्तेसाठी वाट्टेल ते...
अशाच तर चर्चा सगळ्या असतात.
चर्चा कोणत्याही असल्या तरी,
सगळ्याच चर्चा जोरात रंगत असतात !
राजकारणाची नवी दिशा आणि दशा,
सगळ्याच चर्चा सांगत असतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9443
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30ऑक्टोबर 2026

No comments:
Post a Comment