आजची वात्रटिका
---------------------
पैचान कोण?
कानावरती हात ठेवून,
होता येईल तो लांब झाला,
पाचशे कोटीच्या कुजबुजीचा,
आज ऑडिओ बॉम्ब झाला.
कुणाचा झाला तिळपापड,
कुणी म्हणे खूप व्यथित आहे.
येरे उद्योगा बस खांद्यावर...
अजून तरी मामला कथित आहे.
कुणासाठी वाऱ्यावरची वरात,
कुणासाठी वरातीमागून घोडे आहे !
चौथ्या खांबासमोर तर,
पैचान कोण?चे नवे कोडे आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9436
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23ऑक्टोबर 2026

No comments:
Post a Comment