Monday, October 19, 2026

घौडदौड... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

घौडदौड

कुणाचाही बेफाम घोडा,
कुठेही उधळायला लागला.
कुणाच्याही शब्दांचा बॉम्ब,
कुठेही आदळायला लागला.

जसा घोडा उधळतो आहे,
तसा घोडा खिदळतो आहे.
ज्याचे ज्याचे मऊ वाटतेय,
त्याचे त्याचे रान कुदळतो आहे.

लगाम काय? बेलगाम काय?
वाट्टेल तशी घौडदौड आहे !
त्यांचाच बालिशपणा जास्त,
जो कुणी वयाने प्रौढ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9432
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
19ऑक्टोबर 2026
----------------------------




No comments:

घौडदौड... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- घौडदौड कुणाचाही बेफाम घोडा, कुठेही उधळायला लागला. कुणाच्याही शब्दांचा बॉम्ब, कुठेही आद...