Wednesday, October 14, 2026

घोटाळ्यांचे नोबेल... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

घोटाळ्यांचे नोबेल

प्रत्येक भारतीयाला वाटते,
नोबेल भारतात यायला हवे.
त्यासाठी तरी घोटाळेबहाद्दरांना,
नोबेल पारितोषिक द्यायला हवे.

घोटांळ्यामुळे तरीआपली जागा,
नोबेलमध्ये पक्की होईल ! 
दरवर्षी घोटाळ्यांचे नोबेल,
भारतामध्ये नक्की येईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका 
दैनिक झुंजार नेता
13 ऑक्टोबर 2012

No comments:

कठपुतळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कठपुतळ्या ज्या शिकल्या सवरलेल्या नाहीत, देव्या त्यांच्या अंगात आहेत. शिकल्या सवरलेल्यांचे नखरे, ...