Saturday, October 10, 2026

श्रेयवादाची चटक .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
श्रेयवादाची चटक
सत्ताधारी असोत व विरोधक,
श्रेयवादाची लढाई असते.
हम सब एक है.....
सगळ्यांचीच बढाई असते.
जमेल त्याचे श्रेय लाटताना,
कधीच कुणी थकला नाही.
श्रेयवादाचा मोह काही,
कधीच कुणाला चुकला नाही.
श्रेयवादाचा आरोप नाकारणे,
हे तर निव्वळ नाटक आहे!
सोडली तरी सुटत नाही,
अशी श्रेयवादाची चटक आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9423
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10ऑक्टोबर 2026

 

No comments:

श्रेयवादाची चटक .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- श्रेयवादाची चटक सत्ताधारी असोत व विरोधक, श्रेयवादाची लढाई असते. हम सब एक है..... सगळ्यांचीच बढाई...