Monday, October 26, 2026

गेमाडपंथी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
गेमाडपंथी
जिकडे बघावे तिकडे,
अगदी सेम टू सेम चालू आहे.
प्रत्येकाकडून प्रत्येकाचा,
जमेल तसा गेम चालू आहे.
आपलाच आपल्यावर,
कुणाचा गेम उलटतो आहे,
आपलाच आपल्याकडून,
कुणाचा गेम पालटतो आहे.
डावपेचाला डावपेच,
चालीला चाली फुटू लागतात!
सर्वांचे उलटसुलट गेम बघून,
सगळे गेमाडपंथी वाटू लागतात !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9439
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26ऑक्टोबर 2026

 

No comments:

गेमाडपंथी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- गेमाडपंथी जिकडे बघावे तिकडे, अगदी सेम टू सेम चालू आहे. प्रत्येकाकडून प्रत्येकाचा, जमेल तसा गेम चालू आहे...