Sunday, October 25, 2026

घोळात घोळ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
घोळात घोळ
मुद्द्याने मुद्दा सारला जातो,
मुद्द्याने मुद्दा मारला जातो.
सगळा विचका करण्यासाठी,
नवीनच ताल धरला जातो.
पाहिजे त्या तालावरती,
सामान्य लोकांना खेळवले जाते.
घोळामध्ये घोळ घालून,
सामान्य लोकांना घोळवले जाते.
लोकांना गुंगवून ठेवण्यासाठी,
नवा पवित्रा घेतला जातो !
पहिली नशा उतरण्याआधीच,
पुन्हा नवा घोळ घातला जातो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9438
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर 2026

 

No comments:

घोळात घोळ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- घोळात घोळ मुद्द्याने मुद्दा सारला जातो, मुद्द्याने मुद्दा मारला जातो. सगळा विचका करण्यासाठी, नवीनच ताल ...