Tuesday, October 27, 2026

मित्रप्रेम.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------

मित्रप्रेम

पाकिस्तानला वाटले नव्हते,
कॉलिन आपल्याला पावेल.
आपली 'छुपी मैत्री' अशी,
उघड करायला लावेल.

ओसामाच्या 'बिन'वर 
डोलू लागले हिरवे साप.
तरीही वॉशिंग्टन म्हणते 
इस्लामाबादला
"पहिले आप! पहिले आप !!" 

नाटोच्या आत काय ? 
नाटोच्या बाहेर काय ? 
मैत्रीचे चित्र साफ आहे!
'वर्ल्ड ट्रेड सेंटर' सांगते 
"कोण कुणाचा बाप आहे!!"

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा 
दैनिक पुण्यनगरी 
22 मार्च 2012

No comments:

मित्रप्रेम.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  ------------------------- मित्रप्रेम पाकिस्तानला वाटले नव्हते, कॉलिन आपल्याला पावेल. आपली 'छुपी मैत्री' ...