Saturday, October 31, 2026

भीमाशंकर ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
भीमाशंकर
झाडे लावा झाडे जगवा,
सगळेच दिखाऊ वाटू लागले.
गावशिवार केव्हाच काटून झाले,
आता तर सह्याद्रीही छाटू लागले.
जशी समस्या लोकल आहे,
तशी समस्या ग्लोबल आहे.
सह्याद्रीच्या कत्तलीकरणाला,
विकासाचे पॉवरबाज लेबल आहे.
पर्यावरण वाचवा चे नारे,
सगळीकडूनच यायला लागले !
राजकारणाच्या अतिक्रमणाने मात्र,
पर्यावरण प्रदूषित व्हायला लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9444
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31ऑक्टोबर 2026

 

No comments:

भीमाशंकर ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- भीमाशंकर झाडे लावा झाडे जगवा, सगळेच दिखाऊ वाटू लागले. गावशिवार केव्हाच काटून झाले, आता तर सह्याद्रीही छ...