Showing posts with label महामोर्चाची साईज... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label महामोर्चाची साईज... मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, December 21, 2022

महामोर्चाची साईज... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

महामोर्चाची साईज

महामोर्चाच्या आयोजनासाठी,
प्रत्येकाकडून कंबर कसली गेली.
कुणाकुणाला मोर्चाची साईज,
एकदमच नॅनो दिसली गेली.

महामोर्चाच्या साईजसाठी,
रडीचा सूरही आळवला गेला.
नॅनो पासून कंबरेपर्यंत,
महामोर्चा पुन्हा वळवला गेला.

महामोर्चाच्या उद्देशापेक्षाही,
चर्चेत महामोर्चाची साईज आहे !
महामोर्चापेक्षा त्याची चर्चा,
एकदमच सरप्राईज आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6668
दैनिक पुण्यनगरी
21डिसेंबर2022
 

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...