Saturday, July 4, 2020

पक्षीय धोरण

आजची वात्रटिका
------------------------------------
क्षीय धोरण
काही कार्यकर्ते रुजवले जातात,
काही कार्यकर्ते जोजवले जातात.
बंडाची भाषा करणारे,
डावपेच करून कुजवले जातात.
जो झिजला जातो,कुजला जायो
तो कार्यकर्त्यांचा त्याग असतो !
न्याय-अन्यायाचे एकच उत्तर,
तो पक्षीय धोरणाचा भाग असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7333
दैनिक झुंजार नेता
4जुलै 2020

No comments:

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पोट निवडणूक पोटात एक ओठात एक, तरीही जवळीक वाढली जाते. पोटनिवडणूक असली की, ती बिनविरोध काढली जात...