Thursday, August 3, 2023

सोंगट्यांनो सावधान....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सोंगट्यांनो सावधान..

सोंगट्या सोंगट्याशी भांडू लागल्या,
पण खेळविते हात वेगळे आहेत.
जरी वरवर दिसतात वेगळे,
पण वास्तवात यात वेगळे आहेत.

जे करते आणि जे करविते आहेत,
त्यांचे तर चेहरे झाकलेले आहेत.
त्यांचेच हात स्वच्छ तरी,
सोंगट्यांचे हात माखलेले आहेत.

सोंगट्या त्या सोंगट्याच असतात,
त्यांना तर मेंदूचाच पत्ता नसतो !
म्हणून तर नव्या नव्या सोंगट्यांचा,
जुन्याच सोंगट्यांचा कित्ता असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8319
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3ऑगस्ट 2023
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...