आजची वात्रटिका
-------------------------
अवमूल्यन
मोठ्या नेत्यात होतात भांडणे,
कारण त्यांच्यात स्पर्धा आहे.
मोठ्या नेत्यांच्या भांडणामध्ये,
कार्यकर्त्यांचा मात्र खुर्दा आहे.
नेता म्हणजे बंदा रुपाया,
कार्यकर्ते म्हणजे चिल्लर आहे.
आहे ते वास्तव आहे,
जरीही उपमा थिल्लर आहे.
जसा नेत्यांचा छापा असतो,
तसा नेत्यांचाच काटा असतो!
कार्यकर्त्यांच्या अवमूल्यनात,
कार्यकर्त्यांचाच वाटा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8339
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26ऑगस्ट 2023

No comments:
Post a Comment