Thursday, September 7, 2023

झुंडशाही....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

झुंडशाही

झुंडशाही म्हणजे लोकशाही,
सोयीस्कर अर्थ घ्यायला लागले.
लोकशाहीचे रूपांतर,
झुंडशाहीमध्ये व्हायला लागले.

त्यांचा तेवढा दबाव वाढतो,
ज्यांची जेवढी मोठी झुंड आहे.
ते बोलतात उठावाची भाषा,
कुणाची गद्दारी,कुणाचे बंडआहे.

झुंडीत जास्त डोके असले तरी,
झुंडीला मात्र डोके असत नाही !
झुंडशाही म्हणजेच लोकशाही,
यावरती विश्वासच बसत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6914
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -7सप्टेंबर2023
 

No comments:

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- फूट आणि विलीनीकरण फुटीनंतर विलीनीकरण असते, विलीनीकरणानंतर फूट असते. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,...