Tuesday, September 19, 2023

आरक्षण युद्ध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आरक्षण युद्ध

आरक्षणाच्या मागणीसाठी,
जे ते कंबर कसून सिद्ध झाले.
आरक्षण केवळ मागणी नाही,
आता तर आरक्षण हे युद्ध झाले.

आरक्षणाच्या युद्धासाठी,
कुणी जास्तच कडवे होऊ लागले
युद्ध जिंकता जिंकता,
तहनामेच आडवे येऊ लागले.

आरक्षणाच्या मागणीसाठी,
आता साम-दाम-दंड-भेद आहेत !
वारंवार हेच सिद्ध होत झालेय,
न कर्त्याला शनिवारचे वेध आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8359
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...