Thursday, September 21, 2023

हेलिकॉप्टर म्हणाले जेसीबीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

हेलिकॉप्टर म्हणाले
जेसीबीला

कशासाठी झाली आपली निर्मिती?
आपल्या वाट्याला हे काय आले?
तू घालीत बसतोस हारावर हार,
मी उधळतो आकाशातून फुले.

ते वाढवितात आपापली किंमत,
आपले मात्र अवमूल्यन होत आहे !
ते साजरा करतात जल्लोष,
जो तो आपला गैरफायदा घेत आहे.

तुला डोंगर पोखरायला लावून,
चक्क उंदीर काढावा लागतो आहे!
मीसुद्धा घिरट्या घालीत घालीत,
अवमूल्यनाचा शाप भोगतो आहे !!,

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6924
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -21सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...