Friday, September 22, 2023

कर्मवीर अण्णा ऐकलेत का?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कर्मवीर अण्णा ऐकलेत का?

कर्मवीर अण्णा ऐकलेत का?
तुमच्यापेक्षा उलटे व्हायला लागले.
देणगी देणाराच्या बापाचे नाव,
हे सरकारी शाळांना द्यायला लागले.

एकवेळ माझ्या बापाचे नाव बदलीन,
पण शिवरायांचे नाव बदलणार नाही.
तुमच्या ह्या करारी बाण्याची सर,
आज इथे कुणालाही येणार नाही.

तुम्ही 'कमवा आणि शिका' म्हणालात,
हे 'शिकवा आणि कमवा' म्हणू लागले!
शाळांची दत्तक योजना,
जणू त्यासाठीच प्रत्यक्षात आणू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6925
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -22सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...