Thursday, September 28, 2023

उलटी गंगा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उलटी गंगा

थोरामोठ्यांच्या गणपती दर्शनाला,
सेलिब्रिटी लोकांची धाव असते.
सेलिब्रिटींची होती मिरवणूक,
गणपतीचे तर फक्त नाव असते.

सेलिब्रिटी बरोबर गणपतीही
टीव्हीवरती झळकला जातो !
थोरामोठ्यांच्याच नावानिशी,
गणपती बाप्पा ओळखला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8366
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...