Thursday, September 14, 2023

बैलांचा संवाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बैलांचा संवाद

जसा कोरोनाचा माणसांवर,
तसा लंपीचा आपल्यावर डोळा आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्या सावटाखाली,
पुन्हा एकदा यंदाचा बैलपोळा आहे.

जेव्हा माणसांवरती कोरोनाचे,
जीवघेणे संकट बेतलेले होते.
तेव्हा माणसांनीही आपल्यासारखे,
नाका-तोंडाला मुंगसे घातलेले होते.

जान सलामत तो पोळे पचास,
सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल !
वासरात एखादी शहाणी दिसली तरी,
तिलाही जाणीवपूर्वक टाळावे लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8355
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...