Sunday, September 24, 2023

फरपट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

फरपट

खाजवून खरुज आणावी तसे,
जिथे तिथे राजकारण आणले जाते.
राजकारणाशिवाय गत्यंतर नाही,
सगळ्यांकडून असेच मानले जाते.

एकदा राजकारण घुसले की,
त्याच्याच कलाने घ्यावे लागते !
राजकारण जिकडे ओढेल,
तिकडेच फरफटत जावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8364
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...