आजची वात्रटिका
-------------------------
आमच्या पप्पांनी
गणपती आणला....
गणेशोत्सव 2023 प्रसंगी,
प्रत्येकच शब्द परवलीचा बनला.
जो तो ठेक्यात गातो आहे,
आमच्या पप्पांनी गणपती आणला.
गाण्याच्या ठेक्यावरती थिरकणारा,
जसा बाल आहे,तसा वृद्ध आहे.
आपल्याला शोभते की नाही?
याची कुठे कुणाला शुद्ध आहे?
आमच्या पप्पांनी गणपती आणला,
पप्पांच्या पप्पांच्याही ओठी असते !
प्रसार माध्यमांनी सिद्ध केले,
अस्सलपेक्षाही नक्कल मोठी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6923
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -20सप्टेंबर2023
Showing posts with label आमच्या पप्पांनी
गणपती आणला..... Show all posts
Showing posts with label आमच्या पप्पांनी
गणपती आणला..... Show all posts
Wednesday, September 20, 2023
Subscribe to:
Posts (Atom)
खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- खोके आणि धोके खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे. खोक्या आणि धोक्याच...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...
