Friday, June 5, 2026

बिनविरोधचे षडयंत्र ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
बिनविरोधचे षडयंत्र
पूर्वी ज्याचा अभिमान वाटायचा,
त्याची आता किळस येते आहे.
उठता बसता कुठलीही निवडणूक,
आज-काल बिनविरोध होते आहे.
बिनविरोध निवडणूक काढण्याचे,
ज्याचे त्याचे वेगवेगळे तंत्र आहे.
त्यामुळेच वाटायला लागले.
बिनविरोध निवडणूक हे षडयंत्र आहे.
अति झाले आणि हसू आले,
अशीच बिनविरोधची अवस्था आहे !
ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या सोयीची,
आज लोकशाही व्यवस्था आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9298
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 जून 2026

 

No comments:

बिनविरोधचे षडयंत्र ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- बिनविरोधचे षडयंत्र पूर्वी ज्याचा अभिमान वाटायचा, त्याची आता किळस येते आहे. उठता बसता कुठलीही निवड...