Thursday, June 11, 2026

केला तुका; झाला माका

आजची वात्रटिका
--------------------------
केला तुका; झाला माका
कालपर्यंत भेसळ दिसत नव्हती,
आज अचानक भेसळ दिसत आहे.
व्यवस्थेवरतीच व्यवस्था,
आज मोठ-मोठ्याने हसत आहे.
अचानक भेसळ दिसू लागल्याने,
दबक्या चर्चेची घुसळाघुसळ आहे.
जशी पदार्थांमध्ये भेसळ आहे,
तशीच व्यवस्थेमध्येही भेसळ आहे.
केला तुका; झाला माका,
आज अशीच काहीशी अवस्था आहे !
जी भेसळीशिवाय चालतच नाही,
तिचेच गोंडस नाव व्यवस्था आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9304
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 जून 2026

 

No comments:

स्वातंत्र्योत्तर जबाबदारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ स्वातंत्र्योत्तर जबाबदारी स्वातंत्र्य नावाच्या आयत्या पिठावर, तुमचे आमचे रेघा ओढणे चालू आहे. क...