आजची वात्रटिका
--------------------
वडाची रडकथा
एका जन्मात वैतागूनसुद्धा,
साता जन्मासाठी आटापिटा आहे.
त्याही यात सहभागी असतात,
ज्यांना खात्री हा प्रकार खोटा आहे.
मला सगळी फेराफेरी बघूनसुद्धा,
कशाचाच धागादोरा लागत नाही.
म्हणणाऱ्या म्हणतही असतील,
मी बांधल्या धाग्याला जागत नाही.
एकूणच सगळ्या गुंतागुंतीमुळे,
माझाही माथा भडकला आहे !
कसे सांगू नेमका कुणाच्या धाग्यात,
कुणाचा धागा अडकला आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9323
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30 जून 2026

No comments:
Post a Comment