Thursday, June 4, 2026

राजकीय सत्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
राजकीय सत्य
पोरा सोरांच्या हातावर,
पोरा सोरांची टाळी आहे.
बापांच्या सौजन्याने,
लोकशाही लेकुरवाळी आहे.
भारतीय लोकशाहीला,
लेकुरवाळेपणाचा शाप आहे.
हे महत्त्वाचे ठरत नाही,
कोणत्या पक्षात बाप आहे?
राजकीय गर्भपात झाले तरी,
पुन्हा पुन्हा हेच कृत्य आहे !
लेकुरे उदंड जाहली,
हेच आपले राजकीय सत्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9297
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 जून 2026

 

No comments:

स्वातंत्र्योत्तर जबाबदारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ स्वातंत्र्योत्तर जबाबदारी स्वातंत्र्य नावाच्या आयत्या पिठावर, तुमचे आमचे रेघा ओढणे चालू आहे. क...