Wednesday, June 3, 2026

संहितेचा आचार विचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
संहितेचा आचार विचार
काय रगडायचे ते रगडा,
पण किड्यांबरोबर गहू नको.
बारा महिने तेरा त्रिकाळ,
आचारसंहितेचा बाऊ नको.
आचारसंहिता चालू आहे,
न सांगताही गोष्ट पटली पाहिजे.
आचारसंहिता जाचक नको,
लोकांना ती पाचक वाटली पाहिजे.
आदर्श होती,आदर्श आहे,
आचारसंहिता आदर्श पाहिजे !
लोकांना तिचा धसका नको,
तिला लोककल्याणचा स्पर्श पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9296
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3 जून 2026

 

No comments:

घोड्यांचा संवाद .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- घोड्यांचा संवाद राजकारण माजावर आले की, तुझे आणि माझे फावले जाते. तुला मला बाजारात उभे करून, वाट्टे...