Tuesday, June 23, 2026

धोक्याचा इशारा .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
धोक्याचा इशारा
गद्दारीची संसर्गजन्य साथ,
विचित्र वळण घेऊ लागली.
प्रत्यक्ष निष्ठावंतांनासुद्धा,
निष्ठेची किळस येऊ लागली.
निष्ठावंतांपेक्षा गद्दारांचे,
सर्वत्र आगत स्वागत आहे.
सच्चा निष्ठावंत मात्र,
निष्ठेचे फळ भोगत आहे.
निष्ठावंतांना आपल्या निष्ठा,
वेळोवेळी पश्चाताप देऊ शकतात!
निष्ठा आणि निष्ठावंत,
हे शब्द कालबाह्य होऊ शकतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9316
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 जून 2026

 

No comments:

धोक्याचा इशारा .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- धोक्याचा इशारा गद्दारीची संसर्गजन्य साथ, विचित्र वळण घेऊ लागली. प्रत्यक्ष निष्ठावंतांनासुद्धा, निष्ठेची ...