Saturday, June 20, 2026

वर्धापन दिन

आजची वात्रटिका
--------------------
वर्धापन दिन
जसे एकाचे दोन झाले,
तसे दोनाचे चार झाले.
जिकडे बघावे तिकडे,
वर्धापन दिन फार झाले.
ज्यांचा त्यांचा दावा आहे,
आपलाच दिन खरा आहे.
काठावर आहेत त्यांचा,
विचार न केलेलाच बरा आहे.
आरोप आणि प्रत्यारोपात,
दरवेळीच वर्धापन होत आहे!
आपल्या वर्तमानाची साक्ष,
आपला भूतकाळ देत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9313
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 जून 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 30सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 59 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...