आजची वात्रटिका
--------------------------
वर्णी आणि करणी
लोकशाहीच्या मुळावरती,
लोकशाहीचीच करणी आहे.
राज्यसभा आणि विधान परिषदेवर,
बघा कुणा कुणाची वर्णी आहे?
लोकशाही तत्वाच्या गप्पा मारीत,
तत्त्वज्ञ बाजूला सारले जातात.
सच्चा कलावंताऐवजी,
राजकीय कलावंत भरले जातात.
मतदार राजाला कोंडीत पकडून,
मतदार राजा हतबुद्ध केला जातो!
एखादा अपवाद नियुक्त करून,
लोकशाही नियम सिद्ध केला जातो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9303
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 जून 2026

No comments:
Post a Comment