Monday, June 22, 2026

वेट अँड वॉच ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
वेट अँड वॉच
कुणी कुणाच्या व्यासपीठावर जावो,
आपल्या बुडाखाली का आग आहे?
सगळीकडून संविधानिक उत्तर येईल,
हा तर व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.
किती आणि कोणते स्वातंत्र्य घ्यावे?
हासुद्धा त्या त्या व्यक्तीचा भाग आहे.
अनेक डगरीवरती हात ठेवणे,
हा ज्याच्या त्याच्या युक्तीचा भाग आहे.
काळाची उत्तरे काळाला देऊ द्या,
नसत्या छात्या बडवत बसू नका !
आयती संधी मिळाली म्हणून,
उगीचच कुणाला तुडवत बसू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9315
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22 जून 2026

 

No comments:

स्वातंत्र्योत्तर जबाबदारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ स्वातंत्र्योत्तर जबाबदारी स्वातंत्र्य नावाच्या आयत्या पिठावर, तुमचे आमचे रेघा ओढणे चालू आहे. क...