Saturday, June 13, 2026

अवकालीन तुलना...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
अवकालीन तुलना
कोणतीही तुलनात्मक चर्चा,
विध्वंसक वळण घेऊ शकते.
समकालीकांची समकालीकांशीच,
विधायक तुलना होऊ शकते.
प्रत्येकाच्या कर्तृत्वाला,
त्या त्या काळाचे माप असते.
कर्तृत्व कुणाचेही असले तरी,
त्यावर त्या त्याकाळाची छाप असते.
त्यामुळेच करायची असेल तर,
कुणीही कुणाशी तुलना करू शकते!
मात्र अवकालीन तुलना,
अप्रस्तुत व हास्यास्पद ठरू शकते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका- 9306
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 जून 2026

No comments:

अवकालीन तुलना...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- अवकालीन तुलना कोणतीही तुलनात्मक चर्चा, विध्वंसक वळण घेऊ शकते. समकालीकांची समकालीकांशीच, विधायक तुल...