Saturday, June 13, 2026

लकी ड्रॉ


आजची वात्रटिका
------------------------------

लकी ड्रॉ

कुणी फ्लॅट देऊ लागले,
कुणी मारुती देऊ लागले. 
सकाळपासून संध्याकाळपर्यंत, 
सगळेच लोकमत आजमाऊ लागले.

वाचक सुद्धा वाचायचे सोडून, 
कुपन गोळा करण्यात व्यस्त आहेत !
लकी ड्रॉ च्या योजनेमुळे का होईना, 
रद्दीचे भाव आता स्वस्त आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
फेरफटका -371
दैनिक झुंजार नेता 
26 डिसेंबर 2000

No comments:

स्वातंत्र्योत्तर जबाबदारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ स्वातंत्र्योत्तर जबाबदारी स्वातंत्र्य नावाच्या आयत्या पिठावर, तुमचे आमचे रेघा ओढणे चालू आहे. क...