आजची वात्रटिका
--------------------
नीट म्हणाली टीईटीला
आता मात्र पेपर फुटीची,
खरोखरच हद्द झाली.
माझ्यासारखीच तू सुद्धा,
अचानकपणे रद्द झाली.
पहिली फोडून झाली की,
दुसरी फोडण्याचा बेत आहे
आमदारा - खासदारांसारखी,
तुझी आणि माझी गत आहे.
लाखो परीक्षार्थींच्या,
जीवाशी हा खेळ आहे !
तुझा माझा पुनर्विचार व्हावा,
त्याची ही योग्य वेळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9321
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 जून 2026

No comments:
Post a Comment