आजची वात्रटिका
--------------------
सूडनाट्य
राजकीय हवा भरून भरून,
नको तो मुद्दा फुगवला जातो
संधी मिळताच प्रत्येकाकडून,
राजकीय सूड उगवला जातो.
आपल्या राजकीय सूडापोटी,
आरोपांचे जहर पेरले जाते.
जेवढे जेवढे घेरता येईल,
तेवढे विरोधकाला घेरले जाते.
एकदा सूडाची आग पेटली की,
ती सहजासहजी विझत नाही !
सूडाचे राजकारण मग,
कशालासुद्धा मोजत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9320
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27 जून 2026

No comments:
Post a Comment