प्रचाराचा फ्लेवर
महानगरपालिकेने सिद्ध केले,
स्थानिक सत्ता ही वेगळीच पॉवर आहे.
महानगरपालिकेच्या वॉर्डा वॉर्डात,
निवडणुकीचा वेगवेगळा फ्लेवर आहे.
जे जे त्यांच्या पक्षीय आडात आहे,
ते ते त्यांच्या प्रचाराच्या पोहऱ्यात आहे.
जे जे आले बिनविरोध निवडून,
त्यांची निवडही वादाच्या भोवऱ्यात आहे.
त्यांचे त्यांचे तसे जाहीरनामे,
ज्यांचा जसा आचार आणि विचार आहे !
विरोधकांच्या मुद्द्यांची नसबंदी करताना,
कुठे लोकसंख्या वाढीचाही प्रचार आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 68
वर्ष- दुसरे
10 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment