आजची वात्रटिका
-----------------------
आपापल्या जातीय भावना,
आंजरल्या आणि गोंजारल्या जातात.
थोडे काही खाटखुट झाले की,
जाती जातीवर फिंजारल्या जातात.
जातीला जात भेटली की,
एकमेकांना जातीने चुचकारले जाते.
जाती जातीवर फिंजारल्या की,
एकमेकांना जोरात बोचकारले जाते.
स्वकीयांशी आणि परकीयांशी,
जाती जातीचे वेगळे वागणे असते !
जातीसाठी माती खात खात,
जातीचे मरणे आणि जगणे असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9158
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment