आजची वात्रटिका
-------------------------------
मुद्दे जुनेच असले तरी,
मुद्द्यांना मुद्द्यांची जोडणी आहे.
प्रचारापेक्षा प्रसारासाठी,
मुद्द्यांना वादग्रस्त फोडणी आहे.
वादग्रस्त फोडणीमुळे,
मुद्द्यांना गुद्द्यांची जोड आहे !
वादग्रस्त विधानांची तर,
सगळ्यांनाच जुनी खोड आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 66
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
11 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment