आजची वात्रटिका
-------------------------------
सत्तेच्या राजकीय नाट्याचा,
नवा नवा अंक सादर केला जातो.
नाटकाचा उघडा तमाशा होऊन,
जनमताचा अनादर केला जातो.
निवडणुकीच्या निकालानंतर,
कधीही यापेक्षा वेगळे चित्र नाही !
जणू जनमताचा कौलच सांगतो,
जनताच आदरासाठी पात्र नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 73
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
20 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment