आजची वात्रटिका
-----------------------
जेलच्या बाहेरचेही निवडून येतात,
जेलच्या आतलेही निवडून येतात.
आरोपी आणि गुन्हेगारांबरोबर,
जनतेला गुंडही आवडून जातात.
लोकशाहीवरती उगवलेला,
जणू हा मतदारांचा सूड असतो.
आपण ज्यांना गुंड मवाली म्हणतो,
जनतेसाठी तो रॉबिन हूड असतो.
मतदार राजाचे हे औदार्य,
तुम्हा आम्हाला नीट कळाले पाहिजे !
समाजातील प्रत्येक घटकाला,
पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9167
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment