आजची वात्रटिका
-----------------------
कुणी म्हणतो,मतदार विकला गेला,
कुणी म्हणतो,मतदार राजाला भेट आहे.
तुम्हाला सांगायची गरज नाही,
तुमच्याकडे मतदानाचा काय रेट आहे?
तरीही वेगवेगळ्या निवडणुकीचा,
निवडणुकीच्या दर्जाप्रमाणे रेट आहे.
मतदार राजाची लायकी बघून,
अगदी प्रत्येक निवडणूक सेट आहे.
ज्याला वाटता येईल तो वाटतो,
ज्याला लाटता येईल तो लाटतो आहे !
कुणी खाण्यापिण्यावर विकला जाऊन,
लोकशाहीचा गळा घोटतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9162
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15जानेवारी 2026

No comments:
Post a Comment