Friday, January 30, 2026

राजकीय विश्वासार्हता....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय विश्वासार्हता
ज्याचे ज्याचे करता येईल,
त्याचे त्याचे राजकारण केले जाते.
प्रत्यक्ष मरणालासुद्धा,
राजकारणाच्या दारात नेले जाते.
त्यामुळेच वाटते श्रद्धांजली खोट्या,
त्यांची सहानुभूतीही कोरडी असते !
राजकीय नेत्यांच्या खांद्यावर,
त्यांच्याच विश्वासार्हतेची तिरडी असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 78
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
30 जानेवारी 2026

 

No comments:

राजकीय विश्वासार्हता....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राजकीय विश्वासार्हता ज्याचे ज्याचे करता येईल, त्याचे त्याचे राजकारण केले जाते. प्रत्यक्ष मरणालास...