Saturday, January 10, 2026

संगत विसंगत....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
संगत विसंगत
जसा असंगाशी संग आहे,
तसा संगाशी असंग आहे.
प्रत्येकाच्या राजकारणाचा,
आपल्या सोयीचा रंग आहे.
आपापल्या सोयीचे रंग,
सगळेजण उधळू लागले.
कालच्या मूर्खपणावरती,
सगळेजण खिदळू लागले.
तसेच सगळे उफणू लागले,
जसे वाहते वारे आहेत !
कालच्यापेक्षा उलट सुलट,
आज त्यांचेच नारे आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9157
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 जानेवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 9 जानेवारी 2026वर्ष- पाचवेअंक -174 वा l पाने -63

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...