आजची वात्रटिका
-----------------------
कुठे घराणेशाहीचा तर,
कुठे गुंडाचा घोळका आहे.
झुंडशाही आणि गुंडशाहीचा,
लोकशाहीला विळखा आहे.
घराणेशाहीने लोकशाहीची,
चांगलीच जिरवली आहे.
गुंडशाही आणि झुंडशाहीत,
लोकशाही हरवली आहे.
गुंडशाहीची भरती आहे,
घराणेशाहीची आरती आहे !
वाढत्या झुंडडशाहीला,
हुकूमशाहीची स्फूर्ती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9150
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3जानेवारी 2026

No comments:
Post a Comment