आजची वात्रटिका
-----------------------
कोडगेशाही
हे जेवढे काही कोडगे आहेत,
ते त्यांच्याहीपेक्षा कोडगे आहेत.
तरीही सगळे सांगत राहतात,
आमचे सन्मानजनक तोडगे आहेत.
त्यांना सन्मानजनक वाटले तरी,
लोकांसाठी ते संतापजनक आहेत.
सगळ्यांच्याच राजकीय लाचारीचे,
राजकीय तोडगेच मानक आहेत.
कशालाही सन्मानजनक म्हणतात ,
एवढे सगळेच तऱ्हेवाईक आहेत !
त्यांना कशाचेच काही वाटत नाही,
सगळेच कोडगेशाहीचे पाईक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9172
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment