Friday, January 9, 2026

गटार आणि गंगा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
गटार आणि गंगा
राजकारणात हाही नंगा आहे,
राजकारणात तोही नंगा आहे.
राजकारणच सांगू लागले,
मी म्हणजे गटारगंगा आहे.
राजकीय गटारगंगेचे स्वरूप,
हळूहळू जास्तच कळू लागले.
राजकारणात जे झाले गेले,
ते सगळे गटारगंगेला मिळू लागले.
इथे आपले पाप धुतले जाते,
अशी राजकीय धारणा आहे!
वाढत्या राजकीय गटारगंगेत,
रोज वेगवेगळा नवा भरणा आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9156
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 जानेवारी 2026

 

No comments:

गटार आणि गंगा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- गटार आणि गंगा राजकारणात हाही नंगा आहे, राजकारणात तोही नंगा आहे. राजकारणच सांगू लागले, मी म्हणजे गटारग...