Sunday, February 1, 2026

उलटा न्याय....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

उलटा न्याय

मोठ्याचे सगळेच मोठे असते,
छोट्याचे सगळेच छोटे असते.
मोठ्याचे खोटेही खरे तर,
छोट्याचे खरेही खोटे असते.

मोठ्यांचे आणि छोट्यांचे,
दुहेरी असे मापदंड असतात.
मोठ्यांची बरोबरी करण्याचे,
छोट्यांनाही भारी कंड असतात.

मोठे कितीही चुकीचे असोत ,
मोठेच बरोबर धरले जातात !
तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
छोट्यांचे कंड जिरले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9177
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 फेब्रुवारी 2026

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...