Wednesday, February 18, 2026

घोटाळेबाज....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
घोटाळेबाज
यांच्या हाती त्यांचे गुपित आहे,
त्यांच्या हाती यांचे गुपित आहे.
याच्यावरून हे लक्षात येते,
प्रत्येक घोटाळेबाज शापित आहे.
घोटाळेबहाद्दरांच्या घोटाळ्यांना,
इथे घोटाळेबहाद्दरांचीच साक्ष आहे.
विना सहकार नाही उद्धार,
तमाम घोटाळेबहाद्दरांचे लक्ष्य आहे.
परस्परांना धमक्या देऊन देऊन,
प्रत्येक घोटाळेबाज दमला आहे !
तेरी भी चूप; मेरी भी चूप,
जणू असाच सगळा मामला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9193
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18 फेब्रुवारी 2026

 

No comments:

कातडी बचाव .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कातडी बचाव वादग्रस्त घटनांकडेसुद्धा, जो तो आपल्या सोयीने पाहतो आहे, ज्याचा त्याचा घोडा सुद्धा, व...