आजची वात्रटिका
----------------------------
नशेचा डोस
जनतेला वेगवेगळी नशा देऊन,
राजकारण खेळले जाते आहे.
वेगवेगळ्या नशेत धुंद झालेल्यांना,
राजकारण कुठे कळले जाते आहे?
त्यांना असते राजकीय लालसा,
त्यांनाच सत्तेचा प्रचंड सोस असतो.
पहिली नशा उतरण्या अगोदरच,
जनतेला दुसऱ्या नशेचा डोस असतो.
ते जसे सत्तेत झिंगलेले असतात,
तशी जनता नशेत झिंगलेली असते !
जनतेला नशेत झिंगवायची स्पर्धा,
राजकारण्यांमध्ये रंगलेली असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9196
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 फेब्रुवारी 2026

No comments:
Post a Comment