Thursday, February 5, 2026

बंडखोरांच्या टोळ्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
बंडखोरांच्या टोळ्या
कुणी परत यायला लागले,
कुणी परत जायला लागले.
ज्यांना पक्षात घेणार नव्हते,
त्यांनाच परत घ्यायला लागले.
आपल्यासाठी धक्कादायक,
त्यांना आवक-जावक सोपी आहे.
जाणारे येणारे खुशीत,
निष्ठावंतांची मात्र गळचेपी आहे.
एकूणच काय तर सगळीकडे,
निवडून येणाऱ्यांच्या मोळ्या आहेत !
आघाड्या आणि युत्या म्हणजे,
बंडखोरांच्या टोळ्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9181
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 फेब्रुवारी 2026

 

No comments:

बंडखोरांच्या टोळ्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- बंडखोरांच्या टोळ्या कुणी परत यायला लागले, कुणी परत जायला लागले. ज्यांना पक्षात घेणार नव्हते, त्यांनाच...