Wednesday, February 18, 2026

ब्लॅक बॉक्स.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
ब्लॅक बॉक्स
लोकांच्या शंका कुशंकांना,
नवा नवा आधार मिळाला आहे.
तोपर्यंत तर अफवा आली,
ब्लॅक बॉक्सही जळाला आहे.
शंका कुशंकांच्या गदारोळात,
काहीही नीट लक्षात येत नाही !
जणू वाढते राजकीय तापमान,
ब्लॅक बॉक्सलाही सहन होत नाही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 88
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
18 फेब्रुवारी 2026
 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...